सिध्दू मुसेवालाच्या आईने दिला मुलाला जन्म Siddhu Moose Wala

सोशल मीडिया वर होताय फोटो व्हायरल !

पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला च्या घरात खुशिचे माहोल.

वडिलांनी केले फोटो शेअर.

आज 17/03/24 रोजी प्रसिद्ध गायक सिध्दू मुसेवालाच्या आईने दिला मुलाला जन्म.

सिध्दू मुसेवालाच्या मातोश्री चरण कौर यांनी आज पहाटे पाच वाजता मुलाला जन्म दिला.मुसेवालाच्या वडिलांनी स्वतः हि माहिती सोशल मीडिया वर शेअर केली आहे. बलकौर सिध्दू यांनी मुलाचे फोटो शेअर करुन सगळ्यांना माहीत दिली.

फोटोसोबत त्यांनी लिहिले की माझ्या मुलावर प्रेम करणाऱ्या लाखो   चाहत्यांच्या आशिर्वादाने देवाने त्याचा धाकटा भाऊ आम्हाला दिला आहे.आमच्या हितचिंतकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे.

चरण कौर यांनी आई होण्यासाठी विट्रो फर्टिलायझेशन (IVF) तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. गेल्या 3-4 महिन्यांपासून त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या.

पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.29 मे 2022 रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. मुसेवाला नंतर वडील बलकौर सिध्दू आणि आई चरण कौर एकटे पडले.या नंतर दोघांनी मिळून दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.

मुलाचे फोटो :Siddhu Moose Wala

पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला च्या घरात खुशिचे माहोल

.

सिध्दू मुसेवाला

वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म

सिध्दू मुसेवालाच्या मातोश्री चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा सिध्दूने मानसामधुन निवडणूक लढवली होती तेव्हा चरण कौर यांनी कव्हरिंग उमेदवार म्हणून शपथपत्र भरले होते.तेव्हा त्यांचे वय 56 वर्ष सांगितले होते.त्यानुसार त्यांचे वय आता अंदाजे 58 वर्ष आहे. आणि बलकौर सिंग यांचे वय अंदाजे 60 वर्ष आहे.

सिध्दू मुसेवालाची आई

मानसामध्ये झाली होती सिध्दू मुसेवाला ची हत्या

वयाच्या 28 व्या वर्षी सिध्दू ची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 22 मे 2022 रोजी मानसाच्या जवाहरके या गावात 6 शुटर्सनी सिध्दू वर गोळ्या झाडल्या होत्या.या हत्येची जबाबदारी लाॅरेन्स गॅग ने घेतली होती. गोल्डी ब्रारने या हत्येचा कट रचला होता.

पोलिसांनी या प्रकरणात 35 आरोपींची नावे दिली आहेत.यापैकी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे.

बलकौर सिंग आणि चरण कौर आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत.

मुसेवालाचे पहिले गाणे

सिध्दू मुसेवालाचे पहिले गाणे 2017 मध्ये रिलीज झाले होते.

G-Wagon हे मुसेवालाचे पहिले गाण होते.सिध्दूला ‘सो हाय’ या गाण्यातून जास्त प्रमाणात लोकप्रिय मिळाली.

2018 मध्ये , त्यांचे PB1X गाणे बिलबोर्ड कॅनेडियन अल्बम टॅलीमध्ये 66 व्या क्रमांकावर होते. या शिवाय 18 जून 2022 रोजी त्याचे 295 हे गाणं बिलबोर्ड ग्लोबल मध्ये 154 व्या क्रमांकावर पोहोचले.

मुसेवालाचे फाॅलोअर्स

2022 मध्ये सिध्दू मुसेवालाचे सुमारे 11 मिलियन युट्यूबवर फाॅलोअर्स होते. त्यांच्या मृत्यूनंतर हि संख्या सुमारे दुपटीने वाढली आहे.आता त्यांच्या सबस्क्राईबर ची संख्या 23.4 मिलियन आहे.

इंस्टाग्रामवर सिध्दुचे  14.4 मिलियन फाॅलोअर्स आहेत.

हत्येनंतर रिलीज झालेले गाणे

हत्येनंतर मुसेवालाचे 6 गाणे रिलीज झाले आहेत.ड्रीपी हे गाणं थोड्याच दिवसांपूर्वी रिलीज झाले आहे. हे गाणं केवळ 3 आठवड्यात 2.60 लोकांनी पाहिले आहे. या आधी वाॅच-आउट, चोरनी, मेरा नान, वाॅर आणि SYL रिलीज झाले आहे.SYL या गाण्यावर भारत सरकारने बंदी घातली आहे.

आणखी वाचा

Leave a Comment